नशिराबाद । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. भरधाव बलेनो प्रवासी अॅपे रीक्षावर आदळून झालेल्या अपघातात महिला प्रवासी ठार झाली तर रीक्षातील चौघे गंभीर जखमी झाले. आस्माबी शेख मंजूर (30, रा.बोरखेडी, ता.मोताळा, जि.बुलढाणा) असे ठार विवाहितेचे नाव असून रीक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत असं की, जळगावकडून प्रवासी रीक्षा (एम.एच.19 बी.यू.5843) ही कलर व प्रवाशांना घेवून भुसावळकडे बुधवारी सायंकाळी येत असताना पाठीमागून आलेली भरधाव कार (एम.एच.19 ई.ए.5109) ही रीक्षावर आदळली. या अपघातात रीक्षा काही अंतरावर फेकली जावून उलटी झाल्याने रीक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात रीक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (40), करीम बेग शरीफ बेग (वय 29), शेख सादीक शेख इसार (40) व शेख उमेमा शेख जुबेर (6) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.
जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरीष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. केले.
Discussion about this post