कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दोन दिवसीय आंतररांष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात
जळगाव l संशोधन करण्यामागचा हेतू हा समाजाच्या उन्नतीसाठी असून संशोधकांनी समर्पित होऊन संशोधन कार्य केले पाहिजे जेणे करुन संशोधनातून सर्वसामान्य जनतेचे हित वर्धीत झाले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय आंतररांष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना केले.
विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या वतीने गणित व संख्याशास्त्रातील नवीन प्रवाह (रिसेंट ट्रेंडस् इन मॅथमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे शुक्रवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री गुजराथी बोलत होते. यावेळी मंचावर कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रथम कुलगुरु डॉ.एन.के.ठाकरे, माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, बेंगळूरु येथील भारतीय विज्ञान संस्थेचे प्रा.अपुर्व खरे, तुर्की येथील इस्तंबुल टेक्नीकल विद्यापीठाचे प्रा.मुहम्मद कुरले, प्रा.ठाकरे गौरव संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.एस.के.ठाकरे, प्रशाळेचे संचालक व परिषदेचे प्रमुख प्रा.किशोर पवार हे होते. श्री.गुजराथी पुढे म्हणाले की, संशोधनातुन रिमोट आणि रोबोट हे दोन उपयोगी साधने प्राप्त झाले आहेत. संशोधनातील यश हा सातत्यपूर्ण प्रवास असतो. देशासाठी देशातील जनतेसाठी व आपण आपल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्यासाठी कसा करुन देऊ शकतो हा विचार संशोधक प्रामुख्याने करीत असतो.
प्रा. अपुर्व खरे यांनी अगदी तरुण वयात विविध देशात सेवागौरव प्राप्त करुन पुन्हा भारतात गणित विषयाच्या संशोधनासाठी भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणुन सेवा देत आहेत. त्यांनी गणितामध्ये केलेल्या संशोधन व त्याच्या कार्याचा सन्मान करुन यावेळी प्रा.अपुर्व खरे यांना गणितरत्न हा पुरस्कार प्रा.ठाकरे गौरव संस्थेच्या वतीन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप रु. १ लाख ११ हजार व सन्मानपत्र असे आहे. प्रा.खरे यांनी पुरस्काराला उत्तर देतांना सांगितले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा पुरस्कार घेतांना मला माझ्या आजीची आठवण झाली. ती घरात नेहमी बहिणाबाईंची अरे संसार ससांर जसा तवा चुलीवर ही कविता ऐकवायची आणि मला याच विद्यापीठात हा पुरस्कार मला मिळाला याचा मला अभिमान वाटतो.
पुणे विद्यापीठातील प्रा. बी.एन.वाफारे यांनी या पूर्वी दिलेल्या गणितरत्न पुरस्कांरांची माहिती दिली. पुणे विद्यापीठातील प्रा. एम.एम.शिकारे यांनी पुरस्कार सन्मानचिन्हाबाबत माहिती दिली. श्री. एस.के.ठाकरे यांनी पुरस्कारासंदर्भातील डॉ. एन.के.ठाकरे यांच्या उद्देशाची माहिती दिली. माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी प्रा. अपुर्व खरे यांच्या सारखे संशोधक निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगुन ते प्रतिभावान संशोधक असले तरी त्यांच्यातील मानवतावाद व साधेपणा हे दोन गुण वाखाणण्याजोगे आहेत असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी सांगितले की, दोन दिवस गणित आणि संख्याशास्त्र यांचा महाकुंभ येथे होत आहे. देशातील व अमेरीका, तुर्की, इटली, इंडोनिशिया, श्रीलंका या देशातील संशोधक या कार्यशाळेत सहभागी होत आहेत. कोणत्याही संशोधनामध्ये गणित आणि संख्याशास्त्र या विषयांची महत्वपुर्ण भुमिका असते. संशोधन हे माणसाच्या अन्न, आरोग्य आणि संपर्कसाधनांची सहज उपलब्धता या तीन महत्वपुर्ण बाबींशी निगडीत झाले आहेत व त्यांनी त्यांचे विचार विस्तृतपणे मांडले. प्रा. अपुर्व खरे यांनी गणितामध्ये केलेल्या उत्कृष्ट संशोधनाबाबत गौरवौद्दगार व्यक्त केले.
प्रास्ताविक करतांना गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक व परिषदेचे प्रमुख प्रा.किशोर पवार यांनीआंतरराष्ट्रीय परीषदेमागचा उद्देश नमुद केला. या कार्यशाळेत ३० नामवंत संशोधक व्याख्याते व्याख्यान देणार असून २८० संशोधक सहभागी झाले आहेत. दोन दिवसात १८० संशोधन लेख मांडले जाणार आहेत. या परिषदेला प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व अपथिंक एज्युटेक प्रा. लि. यांच्याकडून अर्थसहाय प्राप्त झाले, अशी माहिती प्रा. किशोर पवार यांनी दिली. सुत्र संचालन पल्लवी पाटील व ललिता नेरकर हिने तर आभार डॉ. एम.एम.पवार यांनी मानले.
उद्घाटनानंतरच्या सत्रात प्रा. अपुर्व खरे यांनी पॉलीमॅथ १४ : फ्रॉम वर्ड गेम्स् टु ॲन ॲनलिसीस-डेफिनेशन ऑफ ॲ बेलियन गृप्स् या विषयावर बीज भाषण केले. या सत्राचे अध्यक्ष आय आय टी, मद्रास येथील प्रा. पी. वीरमणी यांनी भुषविले.
दुपार सत्रात गणितशास्त्र विषयाचे व्याख्यान अधिसभागृहात तर संख्याशास्त्र विषयाची व्याख्याने गणितशास्त्र प्रशाळेत समांतर पध्दतीने आयोजित करण्यात आली.
गणितशास्त्रातील व्याख्याने प्रा.एस.आर.घोरपडे यांनी मायनर्स् ऑफ जेनरीक मॅट्रीसेस ॲ ण्ड लिनिअर कोड्स या विषयावर व्याख्यान दिले. अराम रॉबर्ट बिहगम यांनी द क्रोमॅटीक सिमेट्रीक फंक्शन ऑफ युनिसायक्लिक ग्राफ या विषयावर व्याख्यान दिले. प्रा.मुहम्मद कुरुले यांनी डायनॅमिक सिस्टीम्स इन मॅथेमॅटीकल मॉडेलिंग : फ्रॉम थेअरी टू अप्लिेकेशन्स या विषयावर आपले मत भाषणातून व्यक्त केले. डॉ. पडी फुस्टर अग्युलेराय यांनी द रेस्ट्रीक्शन ऑफ द लॅपिशियन ऑपरेटर ऑन मनिफोल्ड्स् या विषयावर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष प्रा.डी.डी.पवार हे अध्यक्ष होते. दुपार सत्रात प्रा.शाकीर अली, प्रा.वाय.एम.बोरसे यांची व्याख्याने झाली. त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन झाले.
संख्याशास्त्रावरील व्याख्याने
प्रा.परमेश्वर पंडीत यांनी एस्टीमेशन ऑफ रिलायबलेटी ऑफ सिस्टीम्स अंडर कंडीशनल स्ट्रेस स्ट्रेथ सेटअप तर प्रा. ज्योती दिवेच्या यांनी अ क्लास ऑफ वेरिएबल चार्ट फॉर डिटेक्टींग प्रोसेस मिन शिफ्ट व्हेन सस्पेक्टींग इंटेरिया या विषयावर व्याख्यान दिले. पुढील सत्रात प्रा. व्ही.बी.घुते, प्रा.आरती राजगुरू, तीर्थंकर घोष, प्रा.शैलजा देशमुख, यांचे व्याख्यान झाले.
त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन झाले.
आज दि. ८ फेब्रुवारी रोजी होणारे सत्र –
सकाळ सत्र :- इतन अल्मायश, अल्बर्टो फॅचिनी, निलेश उपाध्ये यांची गणितशास्त्र विषयावरील व्याख्याने होतील. तर संख्याशास्त्रावरील विषयावर प्रोफेसर सी.तिलकरत्ने, प्रोफेसर जी.आशा, प्रोफेसर सी. सतीशकुमार यांची व्याख्याने होतील.कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.३० वाजता करण्यात येईल.
Discussion about this post