Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले पहा..
बातमी शेअर करा..!

मुंबई । गेल्या रविवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यांनतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. आता खातेवाटपानंतर अनेक मंत्र्यांची पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.

महायुतीच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. महायुतीकडून खातेवाटप झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.

महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच
सध्या महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले. गेल्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता देखील त्यांनाच पालकमंत्री पद द्यावे, अशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. मात्र जिल्ह्यात महायुतीमध्ये भाजपचे ५ आमदार तर शिवसेनेचे चार आमदार आणि अजितदादा गटाचा एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे ज्यांच्या जास्त जागा त्यांचा पालकमंत्री असा कयास लढवला जात असल्याचं समजत आहे. मात्र कोणाच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहेत. त्यामुळे मुंबईतील पालकमंत्रिपदी कोण विराजमान होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांना मृत्यूने गाठले

Next Post

या आठवड्यात सोने-चांदी मोठा बदल; स्वस्त झाले की वाढला भाव? त्वरित घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

या आठवड्यात सोने-चांदी मोठा बदल; स्वस्त झाले की वाढला भाव? त्वरित घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

आदिती तटकरेंची मोठी घोषणा ! लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

April 1, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ ! एकाच झटक्यात 7 नगरसेवकांचं थेट निलंबन, कारण काय?

April 1, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

महाराष्ट्रात टोल दरवाढ लागू; आजपासून महामार्गावरील प्रवास महाग

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

शेतीसाठी सिंचन सुविधा ते शिष्यवृत्तीत वाढ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page