बुलढाणा । राज्यात होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून यातच दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती आज पहाटे हा भीषण अपघात झाला. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मृतकांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.
Discussion about this post