छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान, गाडीला धडक मारून आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून परतत असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना हा अपघात घडला. नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचून तपास करत आहे.
आरोपी ट्रकचालकाने पळ काढला
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढली. जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेले, मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. ट्रक चालकाने गाडीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.















Discussion about this post