जळगाव । चोपडा येथील रहिवासी व मध्य प्रदेशातील महू येथे आर्मी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस असलेल्या शिक्षकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिनेश मधुकर साळुंखे (वय ५०) असे मयत शिक्षकाचे नाव असून या घटनेने चोपडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
दिनेश मधुकर साळुंखे यांचं पश्चात वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. कला शिक्षक दिनेश साळुंखे हे महू येथे वॉकिंगसाठी गेले होते. मात्र ते परतलेच नाही. त्यांच्या पत्नीने किसनगंज पोलिसात हरवल्याची नोंद केली होती. गुरुवारी त्यांनी जंगलातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आले नाही. या घटनेमुळे चोपडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.















Discussion about this post