धुळे । शिरपूर येथील आर. सी. पटेल आय. एम. आर. डी. महाविद्यालयात बीसीएच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नितीन शरद महाजन (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
नितीन शरद महाजन हा तालुक्यातील बाभुळदे येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो शिरपूर येथे आईवडिलांसह राहत होता. आई गावाला गेल्याने चार दिवसांपासून तो बाभुळदे येथे आजोबांकडे राहत होता. २३ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाला कॉलेजला जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला.
त्यानंतर घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, सावळदे येथील पुलावरून तापी नदीत युवकाने उडी टाकल्याची घटना काहींनी पाहिली होती. त्यामुळे नदीपात्रात शोध सुरू झाला. २४ ऑक्टोबरला दिवसभर शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. २५ ऑक्टोबरला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बाभुळदे गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post