मुंबई । दिवाळीसाठी मुंबईहून रेल्वेने गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढलेली असून याचदरम्यान आज सकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वांद्रे स्टेशनवर फलाट क्रमांक १ वर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी झाल्याची घटना नोंदवण्यात आली. ही दुर्देवी घटना नेमकी कशामुळे घडली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमध्ये ९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेची माहिती वॉचमनने पोलिसांना दिली. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर वांद्रे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती. लोकांना सुरुवातीला नेमकं काय घडलं? हे समजलेच नाही. सैरभैर होऊन लोक पळत होते. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यामधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमीवर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी पाच वाजून १० मिनिटांनी आली. त्यानंतर अचानक गर्दी वाढली अन् चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.
जखमी प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे –
1.सुखबीर अब्दुल रहमन, ४० वर्षे
2. परमेश्वर गुप्ता, वय २८ वर्षे
3. रविंद्र चौमा, वय ३० वर्षे
4. रामसेवक प्रजापती
5. संजय कांगेय, वय २७
6.दिव्यांशी यादव, वय १८
7. मोहम्मद शेख, वय २५
8. इंद्रजीत सहानी, वय १९
9. नूर मोहम्मद शेख, वय १८