मुंबई | महाराष्ट्रातील पालघरमधून मोठी बातमी जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती कळते. जीआरपी मुंबईच्या जवानांनी आरोपी कॉन्स्टेबलला मीरा रोड बोरिवली येथे अटक केली आणि त्यानंतर आरोपीला बोरिवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक १२९५६) कोच क्रमांक बी ५ मध्ये ही घटना घडली. ही घटना आज पहाटे 5.23 वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआय टिकाराम यांच्यावर अचानक गोळीबार केल्याने प्रवासी प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
डीसीपी पश्चिम रेल्वे, मुंबईचे संदीप व्ही यांनी प्राथमिक तपासात आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आढळून आले आहे. मात्र त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती तर त्यांना ड्युटीवर का तैनात करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.