पाचोरा । महिलांसह मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच आता पाचोरा तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. पाचोरा शहरातील एका भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मे २०२३ पासून ते आतापर्यंत परिसरात राहणारा संशयित आरोपी सतीश शेजवळ याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीने घरच्यांना सांगितला.
त्यानुसार पीडित मुलीसह घरच्यांनी तातडीने पाचोरा पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सतीश शेजवळ याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश गणगे करीत आहे.
Discussion about this post