जळगाव : जळगावातून अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरी कोणीही नसतांना भावाने आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास त्यांच्यासोबत तिच्या काकांचा मुलगा देखील वास्तव्यास आहे. ही अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. मुलीचे कुटुंबिय घरी नसतांना गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता. तसेच त्याच्याकडून मुलीला मारहाण देखील केली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.याप्रकरणी समुपदेशकांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात पोक्सोकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहे.
Discussion about this post