यावल । तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे गल्लीत खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या अंगावर अचानक घराची जिर्ण भिंत कोसळली. यात मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजरत्न सुपडू बा-हे (वय ७) असं मृत मुलाचं नाव असून नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला.
यावल तालुक्यातील सांगवी बु।। येथे राहणारा राजरत्न बा-हे हा मुलगा गल्लीत खेळत होता. तेव्हा गावातील प्रमोद सोनवणे यांच्या घराची जीर्ण झालेली भिंत अचानक कोसळली. या भिंतीच्या ढीगाऱ्याखाली राजरत्न दबून गुदमरून बेशुध्द झाला. सदरच्या जख्मी मुलास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
याप्रसंगी यावल ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात एकुलता एक मुलाचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेबद्दल यावल पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी रुग्णालयात जाऊन माहिती जाणून घेतली.
Discussion about this post