अमळनेर । अमळनेर पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील पोलीस कोठडीत असलेल्या एका संशयीत आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या शौचालयात गळफास घेत आत्महत्या केली. घनश्याम भाऊलाल कुमावत असं मयत कैद्याचे नाव असून ही घटना आज शनिवारी पहाटे उघडकीस आली. कैद्याच्या आत्महत्यांमागील कारण अद्यापही समोर आले नाहीय. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली
याबाबत असे की, मारवड पोलीस स्थानकाच्या अंतर्गत झालेल्या चोरीच्या प्रकरणी घनश्याम भाऊलाल कुमावत या संशयिताला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या अमळनेर पोलीस स्थानकाच्या कोठडीत होता. त्याने रात्री गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
काही वेळातच ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. संबंधीत व्यक्तीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला ? याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शेवटची माहिती आली तेव्हा जिल्हा पोलीस अधिक्षक सीएमव्ही महेश्वर रेड्डी हे अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. तर, या संदर्भात नोंद करण्याचे कामपोलीस स्थानकात सुरू होते.















Discussion about this post