धुळे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंत पक्ष व चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय बाकी होता. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे याबाबतचा निर्णय देण्यात आला. त्यानुसार राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. मात्र देण्यात आलेला निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत धुळे शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध करण्यात आला.
हा निर्णय मोदी, शहा व फडणवीसांचा असून जनतेला खरी राष्ट्रवादी कुणाची हे माहीत असून, याचे उत्तर जनता आगामी निवडणुकांमधून दाखवून देईल; असा विश्वास देखील यावेळी निषेधकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. तसेच यावेळी नरेंद्र मोदी त्याचबरोबर अमित शहा व देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे बघावयास मिळाले आहे.















Discussion about this post