सांगली । सांगलीत हादरवणारी घटना घडली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. एकामागून एक आठ गोळ्या झाडून आणि धारधार शस्त्रांनी वार करून ही हत्या करण्यात आली आहे. याप्रकणी पोलिसांनी कारवाई सुरु केली असून अशा प्रकारे एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
नालसाब मुल्ला असं या मृत राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला असून या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे, त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर बसले असता, अज्ञात दोन ते तीन हल्लेखोर बुलेट गाडीवरून आले. यावेळी त्यांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले, तसेच धारधार शस्त्रांनी वार केले.















Discussion about this post