नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. मात्र याच दरम्यान भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून पहिल्या पक्षाची विकेट पडली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. पशुपती पारस यांनी राजीनामा देण्यामागचे कारणही सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. मी प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. माझ्या पक्षासोबत अन्याय झालाय. म्हणून मी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे. आजही मी पीएम मोदींचा आभारी आहे. माझ्यासोबत अन्याय झालाय. आज केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय. पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढच्या निर्णयाची माहिती देईन असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे.
पशुपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर ते इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत. पशुपती आज संध्याकाळी पटना येथे पोहोचतील. तिथे त्यांची आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासोबत भेट होईल. पशुपती पारस यांनी इंडिया आघाडीकडे 6 जागा मागितल्या आहेत. आरजेडी तीन जागा देण्यास तयार आहे. नवादाच्या जागेवरुन पेच कायम आहे. आरजेडी नवादा सोडायला तयार नाहीय. पशुपति पारस हाजीपूर आणि प्रिंस राजला समस्तीपूरमधून निवडणूक लढवण्यासाठी राजी केलय.















Discussion about this post