मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिका निवडणुकांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले जालन्यातील माजी मंत्री कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
या नेत्याने यांनी रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का असणार आहे. या बैठकीत त्यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.
पुढच्या आठवड्यात मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश करणार असल्याचेही ठरले असून भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेवर घेण्यात येईल अशी चर्चा अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकांआधी महाविकास आघाडीतील माजी मंत्री भाजपात आल्यास जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे.
Discussion about this post