बीड । एक कोटीच्या लाच प्रकरणात गुन्हा दाखल झालेले बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घराची एसीबीच्या पथकाने झडती घेतली. यावेळी एसीबीच्या पथकाला घरात मोठं घबाड सापडलं. या झाडाझडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबत 970 ग्रॅम सोने व पाच किलो चांदीजप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत.
एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर हे फरार झाले आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस खात्यातून त्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. बीड शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत गतवर्षी सुमारे १०० कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जनावर गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी 60 लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होती.
फौजदारात्त्या घरात सापडले २५ तोळे सोने
सहायक फौजदार जाधवर याच्या घराची बुधवारी रात्रीच झडती घेतली. तिथे १५ हजार रुपयांची रोकड आणि २५ तोळे सोने सापडले. दरम्यान, खाडेचा सहायक व्यापारी कुशाल प्रवोण जैनला न्यायालयाने गुरुवारी २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Discussion about this post