वसई-विरार महापालिकेतील नगररचना विभागाचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या वसई आणि हैद्राबाद येथील घरावर ईडीने धाड टाकली होती. यामध्ये या धाडीत तब्बल 8 कोटी रुपये रोख तसेच 23 कोटींचे सोन्याचे दागिने सापडले आहेत.
नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारती घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरु आहे. त्या प्रकरणी ईडीने तीन दिवसांपूर्वी तब्बल 13 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात बिल्डर, पालिका अधिकारी यांचाही समावेश होता. वाय. एस. रेड्डी हे वसई-विरार महापालिकेचे नगरविकास खात्याचे उपसंचालक असल्याने त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होते विकास आराखड्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. वसई-विरार महापालिकेत 2020 पासून प्रशासकीय राज असल्याने अधिकाऱ्यांना मोकळे कुरन मिळाल्याची आत्ता रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर चर्चा आहे. विशेष म्हणजे रेड्डे हे याआधी निलंबित झाले होते.
2016 मध्ये एका नगरसेवकाला 25 लाखाची लाच देताना वाय. एस. रेड्डी याला ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. तेव्हा त्यांच्या बँक खात्याच्या लाॅकरमधून 34 लाखांची रोकड आणि दोन किलो सोने मिळाले होते. हैदराबाद येथील घरात 92 लाख रुपये रोख आणि चार किलो सोने सापडले होते. त्यावेळी पालिकेने त्यांना निलंबित केले होते. मात्र, 2017 मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.
वसई-विरार महापालिकेत कसे आले?
रेड्डी हा सिडकोचे अधिकारी आहे मात्र 2010 ला प्रतिनियुक्तीवर वसई विरार पालिकेत आला . महापालिकेने 2012 ना उपसंचालक नगररचना या पदावर नियुक्त केले. 7 जून 2011 मधील पालिकेचा सर्वसाधारण ठरावानुसार रेड्डी यांना महापालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यास मान्यता दिली गेली. रेड्डी याने महापालिकेत घोटाळ सुरूच ठेवले होते. आपल्या अधिकाराचा गैरवापर केला होता. त्याची वाच्यता होऊ नये म्हणून त्यांनी तत्कालीन नगरसेवक धनंजय गावडे यांना 25 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.
Discussion about this post