राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल विमान अपघातात मृत्यू झाल असून या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबियांसह बारामतीकरांनी देखील टाहो फोडला आहे. दरम्यान, आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबईहून बारामतीकडे येताना अजित पवार यांच्या खासगी विमानाचा काल सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. यावेळेस त्यांच्या सोबत ४ जण होते. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात अजित पवारांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या बातमीनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली.
ही घटना प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या आणि राज्यातील नेत्यांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली. आज अजित पवार यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणून काम करत असलेले एस पी यू महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन यांच्या अश्रूंचा बांध अखेर फुटला. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे ही अधिकारी अजित पवारांच्या सावली प्रमाणे त्यांच्यासोबत होते. आज अखेरची मानवंदना देताना या दोघांना अश्रू अनावर झाले.















Discussion about this post