बुलढाणा : राज्यात अपघाताच्या होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस टँकर व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान गॅस कंटेनर असल्याने अपघातात गॅस लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातानंतर मात्र महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मलकापूरजवळ अनेक वर्षापासून रखडलेला रेल्वे फ्लायओव्हर वरून रॉंग साईडने वाहतूक सुरू आहे. अशातच रॉंग साईडने आलेला एलपीजी गॅस टँकर समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक झाली. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातग्रस्त वाहनांना आग लागली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
गेल्या वर्षभरात याच ठिकाणी रॉंग साईडने आलेले वाहन समोरून येणाऱ्या वाहनांना धडकुन अनेक अपघात झाले आहेत. मात्र अद्यापही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अपूर्णच असल्याने नेहमी अपघात होत असतात. आज झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Discussion about this post