जालना । राज्यात होणाऱ्या रस्ते अपघाताचे प्रमाणात थांबता थांबत नसून दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. अशातच आणखी एका भीषण अपघाताची बातमी समोर आली असून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकासह एकाचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर निरंकारी पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (वय ३८ वर्ष ) युवराज ज्ञानेश्वर साबळे (वय १३ वर्ष) आत्माराम कारभारी मस्के (वय ३० वर्ष) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मृत बदनापूर तालुक्यातील निकळक गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
एकाच गावातील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर साबळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते मुलगा युवराज साबळे आणि आत्माराम साबळे यांना घेऊन दुचाकीवरून गावी परतत होते.
दरम्यान, दुचाकी हे दुचाकीवरून गावी परतत होते. यावेळी जालना-संभाजीनगर रोडवरील निरंकारी पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांची दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.
या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post