जळगाव : तालुक्यातील वासरे येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. भागवत प्रकाश पाटील (वय ५१) असं मृत शेतकऱ्याचे नाव असून मारवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागवत प्रकाश पाटील यांनी शनिवारी पहाटे सहापूर्वी गावाबाहेरील अमरधामजवळील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत भागवत पाटील यांच्याकडे दोन बिघे कोरडवाहू शेती असून, त्याच्यावरच त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह सुरू होता. त्याच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता व मुलीचे लग्न झाले असून, त्यांच्या पश्चात आता पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. मारवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post