जयपूर । देशभरातील अनेक राज्यात थंडीचा कडाका वाढला असून यादरम्यान, अनेक जण थंडीपासून वाचण्यासाठी रात्री हीटर लावून झोपतात. मात्र रात्रभर हीटर सुरू ठेवून झोपलेले असताना, त्या हीटरमुळे आग लागून दोन महिन्याच्या चिमुरडीसह एका कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
ही दुर्दैवी घना शेखपूर ठाणे क्षेत्रातील मुंडाना गावातील आहे. तेथे राहणाऱ्या दीपकने जयपूरच्या संजू यादवसोबत 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यामुळे सगळे आनंदात होते. त्या रात्री दीपक आणि संजू मुलीस खोलीत झोपले होते, हीटरही सुरू होता. रात्री अचानक हिटरमध्ये आग लागली. त्यामुळे दीपक आणि त्यांची मुलगी निशिका यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजू ही महिला गंभीर भाजली.
त्यांना उपचारासाठी अलवर येथील राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जास्त हीटिंदमुळे हीटरला आग लागल्याचे ग्रामस्थ आणि पोलिसांनी सांगितले. यानंतर आग झपाट्याने पसरत रजईपर्यंत पोहोचली. आणि सगळ्या खोलीत रौद्र रूप धारण केले.
Discussion about this post