कोणाचे नशीब कधी अन् कसे बदलेल काही सांगता येत नाही. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवानमधील एक रोजदांरीने काम करणारा मजुर अवघ्या काही तासात करोडपती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
पश्चिम बंगालच्या खुर्तुबापूर गावात राहणारे भास्कर माळी हे रोजंदारीने काम आणि शेळ्या चारुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. भास्कर माळी यांना लॉटरी लावण्याचा छंद होता त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून ते लॉटरी लावून आपले नशीब आजमावत होते.
कधीतरी नशीब उजळेल अन् आपणही करोडपती होऊ याच आशेने त्यांनी रविवार (१ ऑक्टोंबर) उसने ४० रुपये घेवून लॉटरीचे तिकीट घेतले होते. याच तिकीटाने त्यांचे नशीब पालटले असून त्यांना करोडोंची लॉटरी लागली.
याबाबत भास्कर माळी यांनी सांगितले की, ते नापारा बसस्थानकावर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडून उसने पैसे घेवून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. तिकीट खरेदी करुन ते गवत कापण्यासाठी गेले. माघारी आल्यानंतर त्यांना आपल्याला लॉटरी लागल्याचे समजले.















Discussion about this post