अमळनेर : उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील गांधली रोडवरील सप्तश्रृंगी मंदिराजवळ घडली. युवराज दयाराम पाटील (62, रा.पिळोदा) व मंगलबाई युवराज पाटील (55, पिळत्तेदा) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताला कारणीभूत ठरणार्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
युवराज पाटील व त्यांच्या पत्नी मंगलबाई पाटील या दुचाकीने पारोळा येथे गेल्यानंतर सोमवारी सायंकाळी घराकडे परतत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.व्ही.1332) हे रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकल्याने युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई गंभीर जखमी झाल्या. तातडीने नागरीकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अक्षय किशोर पाटील (पिळोदा) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. हवालदार सुनील पाटील यांनी पंचनामा केला. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.















Discussion about this post