मुक्ताईनगर । मध्यप्रदेशातून येणाऱ्या अवैध गुटख्याचा ट्रक मुक्ताईनगर तालुक्यातील बर्हाणपूर चौफुली पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कंटेनर जप्त करण्यात आला असून याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुनहा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत असे की, रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास नाशिक येथील आयजी यांच्या अंतर्गत असलेल्या पथकाने बर्हाणपूर चौफुलीजवळ एचआर ५५ एक्यू ३८७३ क्रमांकाच्या कंटेनरला अडवून तपासणी केली असता यात पूर्णपणे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा आढळून आला. यामुळे संबंधीत पथकाने कंटेनरसह यातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे. हा साठा नेमका किती रूपयांचा आहे याची माहिती मिळू शकली नसून मात्र लाखो रुपयांचा गुटखा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.















Discussion about this post