जळगाव । अभ्यासाच्या ताणावातून सुसाईड नोट लिहून दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तन्मय गजेंद्र पाटील (वय-१४) असं या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
तन्मय हा आई, वडील आणि मोठ्या भावासह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. त्यावेळी तन्मय याने घराच्या वरच्या मजल्यावर छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना जागेवर तन्मय दिसून आला नाही. म्हणून त्यांनी वरच्या खोली जावून पाहिले असता त्याने गळफास घेल्याचे असून आले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष सोनवणे करीत आहे. मयताच्या पश्चात आई,वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.















Discussion about this post