मुंबई । अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच गणित बदललं आहे.मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महामंडळाच्या वाटपातही काही बदल दिसण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या वाटपासाठी 50-25-25 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष अधिकार समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती, आश्वासन समिती यासह एकूण 25 समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात. या समित्यांवरील आमदारांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सादर करणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे.
महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये 60-20-20 चा फॉर्म्युला, असावा अशी मागणी भाजपने केली होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने 50 25 आणि 25 असा आग्रह धरला. यानुसास भाजप 50, शिवसेना 25 आणि राष्ट्रवादी 25 असा असा आग्रह धरला. शिवसेना-राष्ट्रवादीच्या या मागणीला आता मान्यता मिळणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.