शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं होते. अखेर वादग्रस्त विधान केल्यानंतर भिडेंवर अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
संभाजी भिडे आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवे राहिले नाही. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त विधान केलं. ज्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात आंदोलने केली जात आहे.
पुण्यातही काँग्रेसच्या नेत्यांनी भिडेंविरोधात आंदोलन सुरू केलं असून त्यांच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फडके हौद चौक येथे संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत असून यावेळी कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे.
दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा भिंडे यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते.
Discussion about this post