जळगाव । वनविभागाच्या पथकाने मोहरला ते कोरपावली रस्त्याने अवैधरित्या लाकूड वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर जप्त करत वाहनचालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली याच्याविरुद्ध वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.
उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव यांच्यकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून मोहरला ते कोरपावली रस्त्याने वनपथक दबा धरुन् बसले असताना एका ट्रॅक्टर मध्ये अंजन, निम इमारतीचे अवैधरित्या लाकूड वाहतूक करतअसल्याचे निदर्शनास आले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा केले.
पुढील कार्यवाही जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे अधिनस्थ स्टाफ हे करीत आहेत.















Discussion about this post