यावल । अलीकडे पैशांसाठी विवाहित महिलांचा छळ होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना आता समोर आली. यावल तालुक्यातील कोळवद येथील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत, दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये न आणल्याने फारकतीसाठी धमकी देणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोळवद येथील माहेर असलेल्या नसिबा फिरोज तडवी या विवाहितेने शनिवारी फिर्याद दिली. त्यात तिचा विवाह विवरे बुद्रुक (ता. रावेर) येथील फिरोज अरमान तडवी याच्यासोबत १९ मे २०१३ रोजी झाला होता. विवाहानंतर पती तिच्या चरित्रावर संशय घेऊ लागला. तिला सतत शिवीगाळ व मारहाण सुरू झाली. फारकत देऊन मोकळी हो अशी मागणी झाली. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे यासाठी छळ सुरू केला. नंतर मारहाण करून तिला माहेरी सोडून दिले. त्यामुळे विवाहितेच्या फिर्यादीवरून फिरोज अरमान तडवी, हसिना अरमान तडवी, सलमा आसिफ तडवी, असिफ तडवी, महमूद अरमान तडवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला
Discussion about this post