जळगाव : जळगावातील महिलांना तब्बल लाखो रुपयात गंडविल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. भिशीसाठी पैसे गोळा करण्यासह सासऱ्याच्या उपचारासाठी पैसे उसनवार घेऊन एका दाम्पत्याने १३ महिलांची तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांत फसवणूक केली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हे हिल्स परिसरातील योजनानगरमध्ये राहणाऱ्या महिलांकडून दर महिन्याला भिशीच्या नावाने सविता सोळंखे या महिलेने रक्कम जमा केली. जास्त पैसे मिळतील, असे आमिषही या महिलेसह तिचा पती संजय सोळंखे यांनी दाखवले. त्यानंतर सासरे आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून परिसरातील महिलांकडून या महिलेने उसनवारीने पैसे घेतले; मात्र पैसे परत मिळत नव्हते.
नंतर सोळंखे दाम्पत्य पसार झाल्याने पल्लवी विजय ठोसर (३९, रा. योजनानगर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सविता संजय सोळंखे व संजय धोंडू सोळंखे या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Discussion about this post