मुंबई । शिवसेना शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आज आझाद मैदानात पार पडत आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. सांगली येथून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे.
ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली.ट्रकने पदाधिकाऱ्याच्या गाडीला मागून धडक दिली. या कारमध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे.
Discussion about this post