जौनपूर । देशभरात गुन्हेगारी वाढताना दिसत असून नेत्यांवरही हल्ले होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद यादव (55 वर्ष) यांची गोळा घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
प्रमोद यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकी सोडून पळ काढला.
गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यादव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींची दुचाकी ताब्यात घेतली असून अधिक तपास करत आहेत.
प्रमोद यादव यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस आरोपींचा शोध आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींचा शोध घेत आहेत. प्रमोद यादव हे भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. याआधीही त्यांनी भाजपच्या तिकिटावर मल्हाणीतून दोनदा विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. प्रमोद यादव यांनी 2012 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर जौनपूरच्या मल्हानी मतदारसंघातून लढली होती.
Discussion about this post