नवी दिल्ली । जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात तयार केलेल्या 7 कफ सिरप कंपन्यांची तपासणी केली आहे. आता याबाबत WHOने मोठं पाऊल उचललं आहे. अनेक देशांमध्ये कफ सिरपमुळे 300 हून अधिक मृत्यू झाल्यानंतर त्याला जबाबदार धरुन डब्ल्यूएचओने 7 भारतीय कफ सिरप कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. कफ सिरप कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकळ्यामुळे भारतीय औषध निर्मिती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही महिन्यांत, नायजेरिया, गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक लोकांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. या सर्वांचा मृत्यू कफ सिरप प्यायल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले होते. डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 पेक्षा अधिक कफ सिरपची चाचणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डब्ल्यूएचओने भारतात तयार होणाऱ्या या कफ सिरपबाबत अलर्टही जारी केला आहे.
भारतात तयार होणारे हे कफ सिरप गांबिया आणि उझबेकिस्तानमधील मृत्यूनंतर वादात सापडले आहेत. ज्या सात कंपन्यांना डब्ल्यूएचओने काळ्या यादीमध्ये टाकले आहे ते कफ सिरप प्यायल्यामुळे 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या कंपन्या सध्या चर्चेत आल्या आहेत. विषारी कफ सिरपच्या विक्रीबाबत डब्ल्यूएचओने आतापर्यंत 9 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
Discussion about this post