रावेर । रावेर तालुक्यातून चिमुकलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित नराधमाला बेड्या ठोकल्या असून ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित चिमुरडी रावेर तालुक्यातील एका गावात तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. दरम्यान, रविवारी (ता १८) दुपारी घरात कोणीही नसताना संशयित वामन बळिराम घटे (बेलदार) (वय ६५) याने या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे.
या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.