जळगाव । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे धक्कादायक घटना समोर आलीय. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. प्रज्ञा चेतन शेळके (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून साधारण दीड वर्षांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. दरम्यान विवाहितेच्या पित्याने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत असे की, प्रज्ञा हिचे चाळीसगाव तालुक्यातील करजयी येथील चेतन शेळके यांच्याशी १ एप्रिल २०२४ ला विवाह झाला होता. लग्नानंतर प्रज्ञा आणि पती चेतन हे दोघेही पुण्यात राहत होते. प्रज्ञा ही पाच महिन्यांची गर्भवती होती. मात्र सासरच्या जाचाला कंटाळून ती माहेरी शिरसोली येथे आली होती. दरम्यान गुरुवारी प्रज्ञा हिचे आई- वडिल हे शेतात काम करण्यास गेले होते. यावेळी ती घरात एकटी असताना दुपारच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवले.
प्रज्ञाचे वडील भागवत धामणे हे शेतातून आल्यानंतर घर बंद दिसले. यावेळी त्यांनी आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दरवाजा तोडून आत गेले असता प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी मरत घोषित केले.
सासरच्यांवर कारवाईची मागणी
मुलीच्या मृत्यूने तिच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. तर मृत प्रज्ञाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सासरची मंडळी सतत त्रास देत होते. इतकेच नाही तर गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. या मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. यामुळे कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.















Discussion about this post