यावल : यावल तालुक्यातील निमगाव येथे यावल-भुसावल मार्गावरील नयनसिंग पाटील यांच्या शेताजवळच्या रस्त्यावर ऊस वाहतूूक करणार्या भरधाव वेगाने जाणार्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी घडली. आनंद रघुनाथ सोनवणे (12) असे मयताचे नाव आहे.
यावल तालुक्यातील निमगाव येथील रहिवाशी आनंद रघुनाथ सोनवणे (12) हा विद्यार्थी बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावलहून भुसावळमार्गे मुक्ताईनगरकडे निघालेल्या ऊस वाहतूक करणार्या महेंन्द्रा कंपनीच्या ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 डी.एफ.2535) खाली आला. हा अपघात निमगावजवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळ घडला. याबाबत मयताचे काका किरण फकीरा कोळी यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक सोनू छोटू पारधे (डोडीकर, ता.चाळीसगाव) याच्याविरुद्ध अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी उमेश सानप करीत आहे.दरम्यान, मयत मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे यांनी केले.















Discussion about this post