मुंबई । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असून सगेसोयरे शब्दाची अंमल बजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगे करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावलं आहे. याच दरम्यान, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 आरक्षण मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने जे सर्वेक्षण केलं. त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या मसुद्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास असल्याचा या मसुद्यात उल्लेख आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाछी आरक्षण मिळणार आहे.
Discussion about this post