नवी दिल्ली । आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाची बातमी समोर आलीय. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे.
‘दंगल’ हा चित्रपट गीता-बबिता या कुस्तीपटू बहिणींची कथा आहे. सुहानी भटनागरने या चित्रपटात लहान बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच होती. आता अचानक सुहानीच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे.
फरीदाबादमध्ये राहणाऱ्या सुहानीच्या निधनाचं कारण तिच्या संपूर्ण शरीरात पाणी भरल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. अपघातानंतर उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली, त्याचा साइड इफेक्ट होऊन हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरलं, असं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अवघ्या १९ व्या वर्षी सुहानीने जगाचा निरोप घेतला असून अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Discussion about this post