नवी दिल्ली : जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची सख्या वाढत चालली आहे. भारतात देखील कॅन्सरच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, कॅन्सरवरील लसीबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा दावा केलाय. ते म्हणाले की, रशियन शास्त्रज्ञ कॅन्सरविरूद्ध लस तयार करण्याच्या जवळ आहेत, जी बाजारात लवकरच उपलब्ध होऊ शकते.
पुतिन यांनी रशियात टेलिव्हिजनवर प्रसारित संदेशात म्हणाले आहे की, “आम्ही कॅन्सर रोगावरील लस आणि नवीन पिढीतील इम्युनोमोड्युलेटरी औषधे तयार करण्याच्या अगदी जवळ आहोत. मला आशा आहे की, लवकरच या वैयक्तिक थेरपीच्या पद्धती प्रभावीपणे वापरल्या जातील. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीजमध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत
ही लस कॅन्सरच्या कोणत्या प्रकारासाठी असेल आणि तिचा परिणाम कसा दिसून येईल, याबाबत व्लादिमीर पुतीन यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, अनेक देश आणि कंपन्या कॅन्सरची लस बनवण्यावर काम करत आहे. गेल्या वर्षी, ब्रिटीश सरकारने कॅन्सरच्या उपचारांसाठी क्लिनिकल टेस्ट सुरू करण्यासाठी जर्मनी येथील बायोएनटेकशी करार केला होता.
Discussion about this post