जळगाव । मुंबईतील महिंद्रा कोट बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी सुमारे अडिचशे प्रकरणात मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) शासनाच्या तिजोरीत न भरता स्वत:च्या खिशाला टाकून घेतली. त्यातून शासनाचा एक कोटी दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील या बॅंकेच्या सर्वच शाखांमधील व्यवहारांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.
जळगावातील एकमेव शाखेची मंगळवारी तपासणी सुरु केली आहे, अशी माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी सुनिल पाटील यांनी दिली. अन्य बॅंकांमधील मुद्रांक शुल्क भरणाप्रक्रियेसंदर्भात सतर्क राहावे लागणार आहे. अन्य बॅंकांतील व्यवहारांचीही येत्या काळात चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Discussion about this post