जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून दिवसेंदिवस या घटना वाढताना दिसत आहे. अशातच शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयापासून शंभर पावलांवर असलेल्या सुप्रशॉपच्या सिलिंगचा पत्रा कापून चोरट्धाने शनिवारच्या रात्रीतून सुपरशॉपमध्ये घरफोडी केली.
दुकानातील कैश काउंटर व लोखंडी कपाटाचा पत्रा कापून ५० हजारांची रोकड व पाच बँकांचे कोरे धनादेश लंपास केले. दिवसरात्र वाहतूक असलेल्या प्रमुख रस्त्यावरील सुपरशॉपच्या परिसरात लावलेल्या १६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल कापन चोरट्याने ही घरफोडी केली, कोर्ट चौक ते नवीन बसस्थानक दरम्यान पोलिस मुख्यालयाच्या व पीएसआय निवासस्थानासमोर असलेल्या मणियार सुपरशॉपमध्ये शनिवारी रात्री साडेनऊ ते रविवार सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली.
सुपरशॉपचे व्यवस्थापक चेतन विजय सुलक्षणे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल झाला, तपास हेड कॉन्स्टेबल पल्लवी मोरे करीत आहेत. दुकानातील कंश काउंटरची तोडफोड करून स्वातून २० हजारांची कॅश तसेच एचडीएफसी, कोटक, बंधन, देवनागरी व शिरपूर या पाच बँकांचे कोरे धनादेश तसेच लोखंडी कपाटाचा पत्रा कापून त्यातील ३० हजार रुपये अशी ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली
Discussion about this post