यावल । यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला असून येथे गुरूवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. मात्र अशातच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मानगावकर यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त करण्यात आली आहे.















Discussion about this post