मुंबई । काल दहिसरमध्ये मॉरिसने केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात खळबळ माजली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनीही राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. याच दरम्यान, आता राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
काय आहे राज ठाकरेंचा व्हिडिओ..?
“आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहेत पण ऑर्डर्स नाहीत. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. १०० टक्के विश्वास आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात ४८ तास द्या, त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. फक्त ऑर्डर्स नसतात. पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जावं लागतं असेल, का जातील ते जेलमध्ये?”
“वर बसलेला माणूस टेंपररी आहे. त्याच्यासाठी परमनंट जेलमध्ये जायचं, ह्याला काय अर्थ आहे का? आपल्याकडे उत्तम कार्य करणारे पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. त्यांना फक्त ४८ तास मोकळा हात द्या,” असा पुनरुच्चार राज ठाकरे या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहेत.















Discussion about this post