चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना काल बुधवारी घडली असून याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ असे एकुण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यात त्या कारमधून ५ जण बाहेर पडले त्यांनी तोंडावर रुमाल बांधलेले होते.त्येकाच्या हातात गावठी कट्टा होता. यापैकी ३ जण पुढे आले, तिघांपैकी २ जणांनी गोळ्या झाडल्या या घटनेत माजी नगरसेवक बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. त्याच्यानंतर कारमधील इतर २ जण घटनास्थळी आले.
गोळीबार झाल्यानंतर पाचही जण कारमध्ये बसून नारायणवाडी पेट्रोल पंपाच्या दिशेने फरार झाले. हा सर्वा घटनाक्रम नजीकच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव शहरात मोठी खळबळ उडाली होती, जखमी झालेले बाळू मोरे यांना तातडीने चाळीसगाव वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची आता प्रकृती जरी गंभीर असले मात्र त्यांच्यावर फायरिंग करण्याचा का करण्यात आली याची माहिती समोर आलेली नाही.
या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान बाळू मोरे यांच्या संपर्क कार्यालयात असलेले संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण दोन्ही रा. हिरापूर, सचिन गायकवाड, अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले चारही रा. चाळीसगाव आणि संतोष निकुंभ उर्फ संता पैलवान रा. हिरापूर,चाळीसगाव अशा ७ जणांवर संशय व्यक्त करत त्यांच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.















Discussion about this post