मुंबई । केंद्रीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. बजेटमध्ये दिलासा मिळाला नसला तरी, आता आरबीआयच्या पतधोरण समितीच्या निर्णयामुळे तुमचा ईएमआय वाढणार नाही. पतधोरण समितीने रेपो दर जैसे थे ठेवला आहे. आरबीआयने अलीकडे रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. गेल्यावर्षी फेब्रुवारीत रेपो दर वाढविण्यात आला होता. त्यानंतर तो एक वर्षांपासून कायम आहे.
आरबीआयने जवळपास एक वर्षांपासून रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. आरबीआयने रेपो दरात गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली होती. त्यापूर्वी रेपो दर 6.25 टक्के होता. तो वाढून 6.50 टक्क्यांवर स्थिरावला. तर डिसेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 5.69 टक्क्यांवर होता. त्यामुळे रेपो दरात वाढीची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.
Discussion about this post