राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई अंतर्गत मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 125 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.
ही पदे भरली जाणार :
वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती होईल
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
आवश्यक पात्रता –
वैज्ञानिक सहायक – विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
व्यवस्थापक – माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
वयाची अट: 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]















Discussion about this post