मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालय. यामुळे आगामी निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे.
शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी अर्ज करायला निवडणूक आयोगाने सांगितलं आहे
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी वकिलांशी चर्चा केली. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत शरद पवारांनी फोनवरून चर्चा केली. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. आता सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असेल? त्यावरही बरच काही अवलंबून आहे















Discussion about this post